पहिल्याच पावसात तरेळे-कोल्हापूर राष्टीय मार्गावरील सिमेंट काँक्रीट रस्त्याला तडे गेलेले पाहायला मिळत आहे. यावर्षीच या राष्ट्रीय मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले होते. या मार्गावर अनेक ठिकाणी अशाच प्रकारची परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.