वर्षा पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. कोल्हापूरचा प्रसिद्ध राऊतवाडी चा धबधबा सुरू झाला आहे. राधानगरी तालुक्यातील हा धबधबा पर्यटकांचे नियमित आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. पावसाचे आगार समजले जाणाऱ्या राधानगरी मधिल हा धबधबा 50 ते 60 फुटावरून कोसळतो. त्याचे विहंगम दृश्य पाहण्यासारखे असते. सध्या पावसाचा जोर वाढला असून हा धबधबा आता प्रवाहित झाला आहे.