कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग २० मधील नागरिकांनी बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. साई मंदिर ते वाशी नाका रस्त्यासह नागरी सुविधांची आश्वासने पूर्ण न झाल्याने संतप्त मतदारांनी थेट 'निवडणुकीवर बहिष्कार' असे फलक लावले आहेत. हा मतदारांचा इशारा शहरातील नेत्यांसाठी धोक्याची घंटा असून, कोल्हापुरात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.