चंदगड तालुक्यातील कोवाड गावातल्या गढूळ पाण्याला तरुण वैतागले आहेत. गावातल्या तरुणाकडून पाठपुराव करूनही काहीही होत नसल्याने ग्रामपंचायतीला टाळे ठोकले आहे, मागील अनेक महिन्यापासून गावात गढूळ आणि काळ्या रंगाचे पाणी येत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. काहीच कारवाई होत नसल्याने संतापलेल्या तरुणानी चालू ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.