रत्नागिरीसह कोकणात कडाक्याच्या थंडीने जनजीवन गारठले आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसच्या खाली घसरला असून, ग्रामीण भागात पहाटे शेकोट्या पेटवून थंडीचा आनंद घेतला जात आहे. स्वेटर, कानटोप्या आणि हातमोज्यांचा वापर वाढला असून, थंडीपासून बचावासाठी नागरिक विविध उपाय करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही थंडी वाढली आहे.