कोकणात भजनामुळे रात्री जागू लागल्या आहेत. गणेशोत्सवात भजन ही कोकणातील मोठी संस्कृती मानली जाते. मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल झालेत. हे चाकरमानी सुद्धा या भजनामध्ये रममान झाल्याचे पाहायला मिळतय. संध्याकाळी सहा वाजता सुरू झालेली ही भजन पहाटे चार वाजेपर्यंत सुरू असल्याने सर्वत्र रात्री जागू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भजनांचे स्वर घराघरातून घुमू लागल्याने कोकणातील वातावरण भक्तीमय झालं आहे.