- इचलकरंजी शहरामध्ये खर्चीवाले यंत्रमाग धारकांच्या मजुरी वाढीच्या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन तीव्र होत चालले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये यंत्रमाग बंद ठेवून आंदोलन करण्यात येत असून काही ठिकाणी सुरू असलेल्या मागांवरील कापड कापून संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे यंत्रमाग उद्योगातील वातावरण अधिकच तापले आहे.