ज्या ऊसापासून साखर तयार होते आणि आपल्या दिवाळीतील गोडधोड पदार्थांची चव वाढते, त्याच ऊसाच्या तोडणीसाठी कामगार सणासुदीच्या दिवशीही घाम गाळत असतात.अशाच कष्टकरी ऊसतोडणी कामगारांची दिवाळी गोड करण्यासाठी मंत्री संजय राठोड थेट शेताच्या बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी कामगारांना केवळ शिधा भेटच दिली नाही. तर कामगारांमध्ये मिसळत त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस केली आणि विशेष म्हणजे स्वतः हातात कोयता घेऊन ऊस तोडणीचाही अनुभव घेतला.