कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने चिमुकलीचा जीव घेतल्याने नागरिकांत भीती होती. हा बिबट्या पकडल्याने टाकळीकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र, इतर बिबट्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे, कारण तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढत आहे.