कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावातलं कोपेश्वर मंदिर ग्रामस्थांनी बंद केलं. आजपासून ग्रामस्थांनी पर्यटकांना गाव आणि मंदिरात प्रवेश बंदी घातली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या कारवाईविरोधात आणि गावकऱ्यांच्या हक्कांसाठी खिद्रापूर ग्रामस्थांनी आजपासून गावाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि युवकांच्या उपस्थितीत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं.