भद्रावती (चंद्रपूर) येथे पार पडलेल्या 'वरिष्ठ पुरुष महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद' स्पर्धेत करमाळ्याच्या कृष्णा भागवत याने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. 23 ते 27 डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत कृष्णाने रौप्य पदक पटकावून करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.