सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठाने नुकतीच ‘कृष्णा मॅरेथॉन’ आयोजित केली. यात 2000 हून अधिक धावपटूंनी उत्साहाने सहभाग घेतला. कुलपती डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, तसेच विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. हा सोहळा अत्यंत यशस्वी ठरला.