कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे नळ्याचापाचा येथे एका विहीरीत बिबट्या पडल्याची घटना समोर आली आहे. वेताळबांबर्डे येथील एका ग्रामस्थांच्या घराशेजारील विहीरीत भक्ष्याच्या शोधात असलेला हा बिबट्या पडला होता. याची माहीती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळावर दाखल झाली. ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला रेस्क्यू करण्यात आले.