खोपोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेले शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी आपल्या पदाची सूत्रे आज अखेर स्वीकारली.२६ डिसेंबर रोजी झालेल्या मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर संपूर्ण खोपोली शहर शोकसागरात बुडाले होते.खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत ही घटना घडल्याने,निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी पदांची सूत्रे हाती घेतली नव्हती.