पालघर जिल्ह्यातील दुष्काळाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे.दुष्काळग्रस्तांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या जिल्ह्यातील उर्वरित पाच तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, या मागणीसाठी कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी संघटनांनी जिल्हा मुख्यालयावर धडक मोर्चा काढला.