कुर्डूवाडी नगरपालिका निवडणुकीतील २९ EVM मशिन्स राज्य वखार महामंडळाच्या स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते, माजी आमदार संजय शिंदे आणि धनंजय डिकोळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. २१ डिसेंबरला लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, कुर्डूवाडीतील गल्लोगल्लीत लहान-मोठ्या पैजा लागल्या आहेत.