पेट्रोल पंपावर भौतिक सोयी सुविधा उपलब्ध असणे बंधनकारक असले तरी भंडारा जिल्ह्यात बहुतांश पेट्रोल पंपावर मोफत हवा नावापूरताच लिहून असल्याचे दिसते तर पंपावरील शौचालयांमध्ये सुद्धा घाणीचे साम्राज्य पसरलेले आपल्या पहायला मिळत आहे. नियमानुसार सर्व पेट्रोल पंपांवर सुविधा युक्त स्वच्छतागृह, व मोफत हवा भरण्याची सुविधा उपलब्ध असणे बंधनकारक आहे. पण भंडारा जिल्ह्यात बहुतांश पेट्रोल पंपावर या सोयी सुविधांचा आभाव असताना सेल्स ऑफिसर नेमकी तपासणी कशाची करतात? हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे....त्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना सोयी सुविधांच्या नावाखाली तातकळत ठेवणाऱ्या अशा पेट्रोल पंपावर कारवाईची गरज निर्माण झाली आहे...