चंद्रपूर जिल्ह्यात जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर आता पुन्हा पावसाने मोठी उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतातील कोवळी पिके करपू लागली असून शेतकरी चिंतेत आहेत. पिके वाचवण्यासाठी अनेक शेतकरी तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत आहेत. काही ठिकाणी बांधावरून मोटार सुरू करून दिवस-रात्र पिकांना जीवदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे.