मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत ई-केवायसी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर आता उपाय सापडला आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेतील भगिनींसाठी १८१ हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. ई-केवायसी संबंधित त्रुटी, लाभ स्थगिती किंवा इतर कोणत्याही तक्रारीसाठी या क्रमांकावर संपर्क साधून शंकांचे निरसन करता येणार आहे.