पहिल्याच पावसाने भांडार जिल्ह्यातील लाखांदूर नगरपंचायतीच्या विकासकामांच्या दाव्यांची पुरती हवा काढली आहे. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे लाखांदूर शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असून, रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. विशेषतः वॉर्ड क्रमांक १० मधील संत कबीर परिसरातील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.