भोंदूगिरीतून कोट्यवधींची कमाई केल्याचा आरोप असलेल्या कॅप्टन अशोक खरात यांच्या मालमत्तेचे धागेदोरे पनवेलपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. पनवेल मधील शिरढोण गावात त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर सातबारा नोंद झाल्याचे उघड झाले असून, या जमीन व्यवहारासाठी कोट्यवधी रुपये दिल्याची चर्चा आहे.