बुलढाणा जिल्ह्यात तीन अभ्यारण्य असून बुलढाणा शहराला जंगलाने वेढले आहे.. नेहमी वन्य प्राणी शहराकडे कूच करीत असतात .. अशीच एक लांडोर जंगलातून भटकली आणि बुलढाणा शहरातील जुना गाव परिसरात आली .. तेव्हा काही भटक्या कुत्र्यांनी लांडोरचा पाठलाग करून तिला जखमी केले .. दरम्यान वन्यजीव सोयरे या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लांडोरला कुत्र्याच्या तावडीतून सोडवून वन विभागाच्या स्वाधीन केले.. यावेळी लांडोरवर उपचार करून नजिकच्या ज्ञानगंगा अभ्यारण्यात सोडण्यात आले आहे ...