भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने उमरगा तालुक्यातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून, याच पार्श्वभूमीवर उमरगा येथील काँग्रेस कार्यालयात जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला तालुकास्तरीय नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने काम करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत यश मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. उमरगा तालुक्यातील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसची पूर्वतयारी जोरात सुरू.