परळी वैद्यनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचव्या क्रमांकाचे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर येथे नववर्ष 2026 च्या पहिल्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी परळीत दाखल झाले होते. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटे सकाळी पाच वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. नववर्षात नवीन संकल्प, मनोकामना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आले होते.