कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि भयमुक्त वातावरण राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह रूट मार्च काढत कायदा-सुव्यवस्थेबाबत ठाम संदेश दिला आहे.