गणेशभक्तांनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत, नाचत-गाजत गणरायाचे स्वागत केले. या मिरवणुकीचे विहंगम दृश्य टिपण्यासाठी खास ड्रोनचा वापर करण्यात आला होता, ज्यामुळे हा सोहळा अधिकच भव्य दिसत होता.