थंडी आणि वातावरणातील बदलामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.गेल्या पावसाळ्यात सततचा सहा महिने पडलेला पाऊस आणि अतिवृष्टीमुळे 50 ते 60 टक्के अधिकच्या द्राक्ष बागेचे नुकसान झाले होते. आता थंडी आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागेवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. 200 क्विंटल एकरी उत्पादन निघण्याची अपेक्षा असताना आता 50 क्विंटल उत्पादन निघण्याची अंदाज व्यक्त होत आहे. अतिरिक्त औषध फवारणीमुळे दीड ते दोन लाखांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण बनले आहे.