बांगलादेशने भारतातून कांदा आयातीला परवानगी दिल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात प्रति क्विंटल १५० रुपयांची वाढ झाली आहे. ७ डिसेंबरपासून दररोज १५०० टन कांदा आयात होणार असल्याने उन्हाळ आणि लाल कांद्याला चांगला भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.