दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार शहरात प्रहार जनशक्ती पक्ष आणि सामान्य नागरिकांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.