लातूर जिल्ह्यातल्या औराद शहाजनी भागात 43.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त तापमान औराद शहाजनी भागात जाणवते आहे. उन्हा पासून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. जिल्ह्यात दुपारी एक ते तीन या काळात तीव्र तापमान अनुभवायला मिळते आहे. लातूर शहरात 41.0 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आहे.