लातूर जिल्ह्यातल्या चाकुर तालुक्यातील वडवळ गावात सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नळाला पाणी येत नसल्याने गाकऱ्यांचे हाल होत आहेत. वडवळ गावात पिण्याच्या पाण्यासाठी चार आरओ प्लांटची मान्यता देण्यात आली असली तरी ते अद्याप सुरू नसल्याने गावकऱ्यांची अडचण झाली आहे.