लातूर जिल्ह्यात डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. स्टॉक संपल्याने अनेक पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. पेट्रोल आणि डिझेल मिळविण्यासाठी नागरिकांना तासन् तास रांगेत थांबावे लागत आहे. पेट्रोल डिझेल मिळविण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू आहे.