लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे.वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. लातूर, निलंगा, औसा, चाकुर,रेणापूर, देवणी ,उदगीर ,अहमदपूर भागात मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळतो आहे. ज्वारी, हरभरा, गहू पिकांसह फळबागांचेही अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.