लातूरकरांच्या श्रद्धेचे केंद्र असलेला पापविनाश तीर्थ कुंड कोरडा ठाक पडत चालला आहे.. तीर्थ कुंडातील पाणी आटल्याने मासे, कासव असे जीव जंतू पाण्याविना तडफडू लागले आहेत. ही तडफड पाहून भाविक हळहळ व्यक्त करीत आहेत.. जवळपास दहा वर्षा नंतर हा पापविनाश तीर्थकुंड कोरडा पडला आहे.