लातूर जिल्ह्यातील निलंगा नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या कथित ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय संघटनांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. या निर्णयाविरोधात काँग्रेस, ठाकरेंची सेना आणि वंचित आघाडीकडून निलंगा बंदचा इशारा देण्यात आला आहे.