अतिवृष्टीने नुकसान झालेल्या अनेक कुटुंबांना अद्याप मदत मिळालेली नाही,अशा अनेक कुटुंबांनी आज लातूरच्या तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. लातूर शहरातल्या एलआयसी कॉलनी भागात अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नुकसान झाले होते, त्या घरांचा पंचनामा करण्यात आला, मात्र मदत मिळालेली नाही.त्यामुळे आंदोलकांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.