रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे लातूरमध्ये तीव्र निषेध व्यक्त होत आहे. विविध संघटनांनी लातूर बंदचे आवाहन केले असून बाजारपेठा बंद आहेत. जनतेला त्रास होऊ नये म्हणून आमदार अमित देशमुख यांनी बंद न पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, बंद पुकारलेल्या संघटना आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.