गेले सहा दिवस माय लेकीचे हे औत ओढणे सुरूच आहे. बैलजोडी घ्यायला पैसे नाहीत, डोक्यावर 60 हजारांचे कर्ज आणि पतीच्या दवाखान्यासाठी केलेली आठ लाखांची उसनवारी यामुळे मुक्ताबाई कळसे या त्रासून गेल्या आहेत.