सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांमध्ये राज्य सरकारने 'ट्रिगर १' अंतर्गत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि आगामी उन्हाळ्यात भासणाऱ्या पाणीटंचाईचे सावट दूर करण्यासाठी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.