बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहला व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याची धमकी मिळाली असून, कोट्यावधी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित हॅरी बॉक्सरवर संशय आहे. सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मालाही धमक्यांचा ईमेल आला असून, बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय आहे. या घटनांमुळे सध्या बॉलिवूडमध्ये तणावाचे वातावरण आहे.