नगरपरिषद निवडणुकीमध्ये केचे यांनी विरोधात काम केल्याचा भाजपाच्या पराभूत महिला उमेदवारांचा आरोप आहे. दादाराव केचे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यामागे राजकीय षड्यंत्र असून त्यामागे मोठे नेते असल्याचा आमदार केचे यांचा आरोप आहे. मी ताकतीने भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम केले... असं वक्तव्य आमदार दादाराव केचे यांनी केलं आहे. मला राजकीय जीवनातून नेस्तनाबूत करण्यासाठी हा प्रकार केला आहे. दादाराव केचे यांनी केली पोलिसांत तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे.