नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या उन्हाचा परिणाम आता थेट बाजारपेठेवर दिसू लागला आहे. तापमान वाढत असल्याने बाजारात लिंबाची मागणी प्रचंड वाढली असून त्याचे दरही दीडशे रुपयांच्या पुढे गेले आहेत. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने ग्राहकांना लिंबू खरेदी करताना जादा पैसे मोजावे लागत आहेत. नंदुरबार शहरातील मंगळ बाजार परिसरात लिंबू तब्बल १६० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.