पुण्यातील मांजरी खुर्द इथं शेतकरी पोपट गणपत उंद्रे यांच्या दारातील कुत्र्यावर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास त्यांच्याच शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. बिबट्याची मांजरी परिसरातील दहशत कायम असून गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी मेंढपाळाच्या मेंढ्यांवरतीही बिबट्याने हल्ला केला होता.