अमरावती ते बडनेरा रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेमधील प्रवाशांच्या डब्यावर बिबट्याने झडप घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करून पसरवण्यात आल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून हा व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अमरावती ते बडनेरा रेल्वे मार्गावर किंवा रेल्वे डब्यात अशा कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नाही,असे वनविभाग व रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.