भंडारा जिल्ह्यातील साकोली वनपरिक्षेत्रातील सीतेपार परिसरात पाच वर्षीय चिमुकलीचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. काही दिवसांआधी पहाटे मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अंशिका मिरी हिच्यावर हल्ला करून तिचा जीव घेतला होता.