शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत वाढताना दिसत आहे. वारंवार होत असलेल्या बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री एक शेतकरी ट्रॅक्टरने शेतीकाम करत असताना अचानक त्यांच्या ट्रॅक्टरसमोर बिबट्या येऊन बराच वेळ बसून राहिला.