पुरंदर तालुक्यातील कवडेवाडी-साकुर्डे घाटात थरारक प्रकार समोर आला आहे. चारचाकी वाहनासमोरच बिबट्याने रस्त्यावर ठिय्या मांडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी रात्री पिंगोरीहून साकुर्डेकडे जात असताना तरुणांच्या चारचाकी गाडीसमोर जवळपास एक किलोमीटरपर्यंत बिबट्या चालत राहिला.