बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातील पळसखेड दौलत शिवारात बिबट्याचं दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून शिवारात जाणं टाळलं होतं. यासंदर्भात माहिती मिळताच चिखली पोलिस आणि वन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल होत बिबट्याला कोणतीही जीवितहानी न होता सुरक्षितपणे जेरबंद केलं.