पुण्यातील केशवनगरमध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळाला आहे. ‘कोणार्क रिवा’ आणि ‘एल्कोन सिल्व्हर लीफ’ सोसायटीच्या पार्किंग परिसरात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. माहिती मिळताच वन विभाग व बचाव पथकाने तपासणी सुरू केली. बिबट्या सापडला नसला, तरी पाण्याच्या टाकीजवळ त्याचे पायांचे ठसे आढळले. नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.