आंबेगाव तालुक्यातील मांदळवाडी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करून ताब्यात घेण्यात वनविभागाला यश मिळालं आहे. अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने वनविभागाने मोठ्या संखेने बिबटे पकडण्यासाठी पिंजरे लावले आहेत. या पिंजऱ्यात आता बिबट्या जेरबंद झाला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 80 पेक्षा जास्त बिबटे जेरबंद झाले आहेत.